एकदा मुल्ला नसरुद्दीन रस्त्याने जात असता त्याला एक आरसा सापडला. पहिल्यांदाच पाहील्यामुळे आरसा ही काय चीज असते त्याला माहीत नसते. त्याने आरश्यात पाहीले आणि अवाक होऊन म्हणाला," हुं बडे मिया, यह तो मेरे पिताजीकी तस्वीर है, ये तो मैने कभी सोचाही नही था की मेरे पिताजी इतने शौकीन होंगे की अपनी तस्वीर भी उतरवाये, बरं झालं मलाच सापडले ते आणि घरात त्यांची तस्वीर पण नाही. ही तस्वीर घरीच जपून ठेवीन म्हंतो." त्याने खुप आदरपुर्वक व जपून तो आरसा घरी आणला आणि बायकोपासून लपवून माळ्यावर एका कपड्याच्या गाठोड्यात दडवून ठेवला. त्याने विचार केला की बायकोला ही गोष्ट दृष्टीस पडता कामा नये, कारण तीचा आणि पिताजींचा छत्तीसचा आकडा सगळ्य़ा गल्लीला माहीत आहे. अब्बूजान गेल्यावर तिने सगळ्यांना वाटलेले बुंदीचे लाडू अजून कोण विसरेल बरे? आणि ही तस्वीर पाहून ती भडकली तर काय खरं नाही.
पण पुरुष कितीही लपविण्याचा प्रयत्न करो तो आपल्या बायकोपासून काही लपवू शकत नाही. तो ज्याप्रकारे लपवन्याचा प्रयत्न करतो त्यामुळे तो लगेचच सापडतो. मुल्लाचे चोरुन घरात येणे दबल्या पावलांनी चालणे पाहून पत्नीने बरोबर ओळखले की मामला कुछ खास आहे.
मुल्ला खाऊन पिऊन घराबाहेर पडेपर्यंत तिने कड काढला आणि त्यानंतर लगेचच तिने त्यावस्तूचा शोध लावला. तिने ते गटळे उघडले आणि आरसा काढून पाहीला आणि किंचाळलीच," अच्छा, तो अब इस चुडैल के पिछे पडे है मियां?"
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
एक माणुस गावामध्ये आपल्या नातेवाईकाकडे जात होता, एक घरा समोर त्याला भरपुर गद्दी दिसली. उत्साहाने तो त्या गद्दी मध्ये काय चालु आहे ते पहाण्यासाठी गेला. पण पुढे काय चालु आहे ते त्याला दिसत नव्हते. त्याने एकाला विचारले ही गद्दी कसली आहे?
गावाक-या सांगितले, "अमितच्या म्हैशी ने त्याच्या सासुला लाथ मारली आणि सासु मेली.’
"ओ.. हे... हे तर फार वाईट झाले... लोकांची बरीच गद्दी दिसत आहे.. त्यांचे बरेच मित्र-नातेवाईक होते."
गावकरी. "अरे नाही रे, ही गद्दी तर त्या म्हैशीला खरीदना-यांची आहे, जिने अमितच्या सासुला लाथ मारली."